"चाय पे चर्चा विथ विक्रांत पाटील" ला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद..
मा.उपमहापौर विक्रांत पाटील आयोजित "चाय पे चर्चा with विक्रांत पाटील" ला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद.
पनवेल / वार्ताहर : - प्रभाग १८ चे नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच प्रभागात अनोखे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात.महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी मेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रम,मोफत इ-श्रम कार्ड शिबीर,मोफत आधारकार्ड-मोबाईल लिंक शिबीर,जेष्ठ नागरिकांसाठी मोबाईल ची अद्यावत माहिती शिबीर असे अनेक उपक्रम आतापर्यंत राबविले आहेत,याच बरोबर "माझा प्रभाग माझा परिवार" या अनुषंगाने प्रभागातील समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य देत आले आहेत.याच विषयाचा धागा पकडून दि-१४/०४/२०२२ प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी 'चाय पे चर्चा विथ विक्रांत पाटील' चे आयोजन जनसेवकार्यालयात करण्यात आले होते.
'एक कप चहा सोबत,आपल्या समस्यांवर काढू मार्ग' असें अनोखे टॅग लाईन याउपक्रमाला देण्यात आले होते.आलेल्या प्रत्येक नागरिकांचे म्हणं आणि सूचना विशेष लक्ष देऊन ऐकत होते व सर्व गोष्टी फॉर्मवर नमूद करून घेत होते.रस्ते,नाले, उद्याने,महापालिकेतील कामे,नौकरी आणि शाळा-कॉलेज मधील प्रवेश असें विविध विषयांवरील समस्या आणि सूचनांवर नगरसेवक विक्रांत पाटील यांनी आलेल्या नागरिकांच्या बरोबर चर्चा केली.प्रभाग १८ मधील नागरिकांनी *चाय पे चर्चा with विक्रांत पाटील* ला भरघोस प्रतिसाद दिला.नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निरसन करण्याचा  ध्यास नगरसेवक विक्रांत पाटील यांनी घेतला आहे त्याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
Comments