सात वर्षीय वृंदा साखरे हिचे केले आ.प्रशांत ठाकूर यांनी कौतुक
पनवेल , दि ०५ (संजय कदम ) : नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडवानिमित्त आयोजित पनवेल येथील शोभायात्रेमध्ये सात वर्षीय वृंदा मंदार साखरे हिने सहभाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रथम पारितोषिक देताना तिचे कौतुक केले.
शोभायात्रेत सहभाग घेणाऱ्यासांठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वयोगट १ ते १० मधील मुलांसाठी "संत बनणे" हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेत वृंदा मंदार साखरे इयत्ता दुसरी हिने सहभाग घेऊन हि "संत कान्हो पात्रा" बनली होती. यात तिने प्रथम क्रमांक पटकावला होता याबद्दल तिला नववर्ष स्वागत समितीतर्फे आ. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
फोटो : आ.प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते चिमुकलीचा सन्मान