श्री स्वामी समर्थ महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी
पनवेल दि.०५ (वार्ताहर) : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित शाखा नवीन पनवेल (पोदी नं.3, मारुतीमंदिर) केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री स्वामी जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचे षोडशोपचार पुजन करण्यात आले तसेच शेकडो स्वामी सेवेकरींनी श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण केले, सायंकाळी 6.30 वाजता महानैवेद्य आरती होवून सर्व सेवेकरींनी मांदियाळीचा (महाप्रसाद) लाभ घेतला. पुढे 21 एप्रिल ते 28 एप्रिल वरील ठिकाणी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह संपन्न होईल असे आयोजकांनी जाहीर केले.
फोटो : श्री स्वामी समर्थ महाराज जयंती साजरी करताना स्वामीसेवक