पनवेल मधून दांपत्य बेपत्ता ..
पनवेल मधून दांपत्य बेपत्ता ..
पनवेल, / दि ०५ (संजय कदम ) : वॉकिंगला जातो असं सांगून राहत्या घरातून घराबाहेर पडलेले नवरा - बायको हे अद्याप घरी न परतल्याने ते हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे 
            विजय सदाशिव दातार (७१ ) व  त्यांची पत्नी ममता (६९) रा . साई अंबे आशिष अपार्टमेंट हे दोघे फेरफटका मारण्यासाठी जातो असं सांगून राहत्या घरातून घराबाहेर पडले होते. विजय दातार यांच्या डोक्याचे केस अर्धवट टक्कल असून केस मध्यम काळे पांढरे , रंग सावळा उंची ५ फूट ४ इंच, अंगाने मध्यम असून अंगात निळ्या व पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेला बाह्यांचा शर्ट , गडद निळ्या रंगाची फुल पॅंट व पायात काळ्या रंगाची चप्पल आहे तर ममता यांचे केस लांब काळे - पांढरे , नाक गोल , रंग सावळा , उंची ५ फूट २ इंच , अंगाने मध्यम असून अंगात हिरव्या रंगाचा गाऊन त्यावर लाल रंगाचे पट्टे आहेत, पायात चामड्याची काळ्या रंगाची चप्पल आहे व सोबत मोबाईल फोन आहे . या दोघांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे , दूरध्वनी ०२२-२७४५२३३३ किवा  पोहवा एस. एस . नवले  यांच्याशी संपर्क साधावा. 


फोटो : बेपत्ता विजय व ममता दातार
Comments