विचुंबेत ५९ वी "महाराष्ट्र श्री २०२२" राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा
बुधवार ६ एप्रिल रोजी विचुंबेत ५९ वी "महाराष्ट्र श्री २०२२" राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा
पनवेल(प्रतिनिधी) : - महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन, बॉडी बिल्डर्स अँण्ड फिटनेस असोसिएशन रायगड, इंडियन बॉडी बिल्डर्स अँण्ड फिटनेस फेडरेशन आणि भारतीय जनता पार्टी विचुंबे यांच्या वतीने बुधवार दिनांक ०६ एप्रिल रोजी सायंकाळी ०५ वाजता ५९ वी "महाराष्ट्र श्री २०२२" राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

विचुंबे गाव येथे हि स्पर्धा होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेश लांडगे, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, छत्रपती पुरस्कार विजेते संजय मोरे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
यावेळी ८ वी वुमेन फिजिक, ५ वी  मेन फिजिक आणि दुसरी क्लासिक बॉडी बिल्डिंग स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेचा लाभ क्रीडा रसिकांनी घ्यावा, असे आवाहन विचुंबे ग्रामपंचायत उपसरपंच प्रमोद भिंगारकर, असोसिएशनचे आयोजक सचिव दिनेश शेळके, रायगड कार्याध्यक्ष मारुती आडकर यांनी केले आहे. 
Comments