हिंद मराठा महासंघाचे २९ ला इंदोर येथे तर १ मे ला सुरत अमरोली येथे भव्य मेळावा आयोजन..
१ मे रोजी सुरत अमरोली येथे भव्य मेळावा आयोजन

इंदोर ( प्रतिनिधि) हिंद मराठा महासंघ राष्ट्रीय संघटनेची नुकतीच स्थापना करण्यात आली समाजहित डोळ्यासमोर ठेवूनच ही घोड दौड देशभर सुरु आहे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व देशभर पसरलेल्या मराठा बांधवांना एकत्र करून राष्ट्रीय पातळीवर मराठा समाजाच्या आर्थिक शैक्षणिक सामाजिक उन्नतीसाठी झटणारी पक्ष विरहित सामाजिक राष्ट्रीय संघटना म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झाली व देशभर पसरलेल्या लाखो समाज बांधव मोठ्या प्रमाणात या संघटनेत सामील झाले आहेत दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता इंदोर येथे भव्य मेळावा आयोजन करण्यात आले आहे तसेच मध्य प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन सोहळा राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे
       या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीरराव पालांडे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवक्ते ॲड किशोर बांदल देशमुख हरियाणा राज्य अध्यक्ष राम नारायण मराठा राज्य सल्लागार शरद पवार राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र सतलकर मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय सावंत रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष राजेश निकम गुजरात राज्य अध्यक्ष देवेश माने बडोदे जिल्हा अध्यक्ष प्रदीप मोरे आदी मान्यवरांसह हजारो समाज बांधव प्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान मध्य प्रदेश अध्यक्ष व समाज जेष्ठ नेते मल्हारराव कदम हे भुषवणार आहेत.
Comments