ब्रेक फेल होवून झालेल्या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान...
ब्रेक फेल होवून ट्रकला झालेल्या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान
पनवेल, दि.25 (संजय कदम) ः पनवेलजवळील मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे मुंबई लेनवर खांदेश्‍वर पोलीस स्टेशन हद्दीत किलोमीटर 1.750 येथे आज झालेल्या ब्रेक फेल होवून ट्रकच्या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असले तरी या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.
यातील ट्रक  क्र. एमएच 10 सीआर 1866  यावरील  चालक फक्रुद्दीन सिराज नदाफ वय.36,रा.तळसंदे हा मुंबई  बाजूकडे चालवित जात असताना समोरून चालणारे कंटेनर ट्रेलरने अचानक ब्रेक मारल्याने ट्रक वरील  चालकाने ब्रेक मारला असता ब्रेक फेल होऊन त्याचा त्यांचे ट्रक वरील नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या डावे बाजूचे रेलिंगला  धडक देऊन  रेलिंग तोडून अपघात केला आहे.  सदर अपघातामध्ये  कोणीही जखमी नसून ट्रकचे  नुकसान झालेले आहे. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांची पथक सदर ठिकाणी पोहचून त्यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. तसेच सदरचे  वाहन रोडच्या तिसरे लेनवर   असल्याने त्याठिकाणी कोन लावले. त्यानंतर दोन्ही लेनवरुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.


फोटो ः अपघातग्रस्त वाहन
Comments