सदानंदराव भोसले यांच्या हस्ते हिंद मराठा महासंघ मुंबई प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन..
 मुंबई प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन..

पनवेल / वार्ताहर : -  हिंद मराठा महासंघ मुंबई प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
सनई चौघडे ढोल ताशांच्या गजरात तुतारी च्या मंजुळ स्वरात आसमंत दणाणून सोडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय सावंत तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीरराव पालांडे कोकण प्रदेशाध्यक्ष विनोदराव चव्हाण राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड आनंदराव भोसले,राष्ट्रीय सचिव शिवाजीराव पालांडे, प्रदेश सरचिटणीस प्रवक्ते श्रीकांत चाळके, राज्य सल्लागार प्रवक्ते प्रा संजय शिंदे, महीला अध्यक्षा कोकण ज्योती भोसले, मुंबई प्रदेश अध्यक्ष भक्ति भार्गव, भोसले चित्रपट रंगभूमी विभाग राष्ट्रीय अध्यक्ष निलेश पालांडे, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष राजेश निकम, कोकण सरचिटणीस संजय रेवणें, रत्नागिरी जिल्हा उप अध्यक्ष विजयराव येरूनकर, बोरीवली उपनगर अध्यक्ष प्रभाकर सुर्वे व शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी विश्व वंदनीय शिवराय यांचे पुतळ्यास अभिवादन करून मराठा मेळाव्यास उपस्थित मान्यवर पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
Comments