मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी पाडा मोहल्यात करून घेतली नाले-सफाई..
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी पाडा मोहल्यात करून घेतली नाले-सफाई.

पनवेल दि,२१(संजय कदम)- : प्रभाग १८ मधील पाडा मोहल्यात नाले आणि गटारांची दुरवस्था झाली होती,सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत होते.गटारीचे पाणि उलटे फिरून नागरिकांच्या घरात जात होते.
    
या बाबतची तक्रार परिसरातील नागरिकांनी कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे केली.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आणि रोगराई पसरण्याची भीती लक्षात घेता नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्वरित महापालिकेच्या आरोग्य अधिकार्यांशी बोलून घेतले आणि तातडीने पाडा मोहल्यातील साफसफाई करून घेऊन मोहल्यातील नागरिकांना दिलासा दिला दिला.रमजानच्या पवित्र महिन्यात नालेसफाई करून घेतल्याबद्दल मोहल्यातील नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांचे आभार मानले.


फोटो: साफ सफाई करताना कर्मचारी
Comments