केंद्र सरकारने केलेल्या महागाई विरोधात पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत मोर्चा....
 महाविकास आघाडीचा दणदणीत मोर्चा

पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः गेल्या काही दिवसापासून दररोज केंद्र शासनाकडून पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडत चालले असून सर्वसामान्यांचे गॅस व भाजीपाल्याच्या वाढत्या दरामुळे दररोजचे बजेट कोलमडले आहे. या दरवाढीविरोधात आज पनवेलमध्ये शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस व समाजवादी या महाविकास आघाडीच्या पक्षाने एकत्र येवून दणदणीत मोर्चा काढून केंद्र शासनाचा निषेध केला.
या मोर्चाचे नेतृत्व पनवेल - उरण महाविकास आघाडी व शिवसेना जिल्हा सल्लागार बबन पाटील व आ.बाळाराम पाटील तसेच सचिव सुदाम पाटील यांनी केले. या मोर्चात मा.आ.मनोहरशेठ भोईर, जिल्हाप्रमुख शिरिष घरत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, राष्ट्रवादीचे नेते जी.आर.पाटील, महिला आघाडी उपजिल्हा संघटक कल्पना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, नगरसेवक सतीश पाटील, भरत पाटील, गुरुनाथ पाटील, योगेश तांडेल, दिपक घरत, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, रामदास शेवाळे, प्रदीप घरत, चंद्रशेखर सोमण, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजेंद्र पाटील, काशिनाथ पाटील, नगरसेवक गणेश कडू, नगरसेवक रवींद्र भगत, परेश पाटील, प्रदीप ठाकूर, राजेश केणी, प्रथमेश चंद्रशेखर सोमण, यतीन देशमुख, डी.एन.मिश्रा, सदानंद शिर्के, प्रवीण जाधव, पराग मोहिते,अच्युत मनोरे,राहुल गोगटे, अभिजीत साखरे, सनी टेमघरे, दर्शन ठाकूर, नंदराज मुंगाजी, नगरसेविका प्रिती जॉर्ज, अनुराधा ठोकळ, माधुरी गोसावी, शशिकला सिंह, विद्या चव्हाण, निर्मला म्हात्रे,अर्चना कुळकर्णी, उज्वला गावडे, लतीफ शेख, जितेंद्र म्हात्रे यांसह हजारोंच्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहरातील नीलकंठ दर्शन जवळील मोकळ्या भूखंडापासून आज सकाळी मोर्चाची सुरूवात झाली. त्यानंतर एस टी स्टॅण्ड समोरून पनवेल मध्ये प्रवेश करून लाईन आळी - आदर्श नाक्यावरून डावीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार तेथून उजवीकडून भाजीमार्केट रस्ता - टपाल नाका - महात्मा गांधी रोड कापड बाजार - जय भारत नाका - महानगरपालिका - प्रांत ऑफिस असा धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना आयोजक बबन पाटील यांनी सांगितले की, केंद्र सरकारमुळे वाढलेले भाव गॅस , भाजीपाला ने रडवले राव ... केंद्र सरकारच्या धोरणा शून्य कामकाजामुळे सामान्य जनता भरडली जात आहे . पेट्रोल डिझेल घरगुती गॅस यांचे रोजचे वाढते आकडे, महाराष्ट्र द्रोही केंद्र सरकारचा तपास यंत्रणांचा सतत गैरवापर , महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचा नेत्यांचा भ्रष्टाचार, बँक घोटाळा ’ विक्रांत ’ घोटाळा या सर्वाच्या विरुद्ध सामान्य नागरिकांच्या भावनेला आणि आकोशाला वाट करून देणारा धडक मोर्चा काढला असल्याचे त्यांनी सांगितले. तर यावेळी बोलताना आ.बाळाराम पाटील यांनी सांगितले की,  केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभारामुळे रडकुंडीला आलेल्या सामान्य जनतेच्या पाठीशी महाविकास आघाडी ठामपणे उभी असून या सर्व समस्यांमधून सामान्य माणसाला त्वरित दिलासा देण्यासाठी व केंद्र सरकारचा जाहीर आणि तीव्र निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी तर्फे पनवेल मध्ये भव्य व धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने केंद्र सरकारविरुद्ध प्रक्षोभ यावेळी दिसून आला असल्याचे त्यांनी सांगितले. तर जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी सांगितले की, पनवेल महानगरपालिकेने पूर्वलक्षी लादलेल्या मालमत्ता कराचा निषेध व नागरी समस्या सोडविण्यात महापालिकेला आलेले अपयश पाणी रस्ते, घनकचरा गैर व्यवस्थापन , वाहतूक कोंडी, जल / वायू प्रदूषण, शौचालयांची कमतरता, आरोग्य सुविधांचा अभाव , महापालिका शाळांचा निकृष्ट शैक्षणिक दर्जा, पार्किची समस्या, अवैध व बेकायदेशीर अवजड वाहनतळ समस्या, महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागातील नागरी सुविधांची गैरसोय आदीसंदर्भात मोर्चाद्वारे संताप व्यक्त केला आहे व आगामी निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखविल्याशिवाय येथील जनता स्वस्थ बसणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रांत कार्यालयासमोर पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांना महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने निवेदन देवून सर्वसामान्य नागरिकांच्या भावना व मागण्या केंद्र शासनाकडे पाठविण्याची विनंती केली. या निमित्ताने सकाळपासूनच पनवेल शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
वैशिष्ट्ये
1) केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी अनेकांनी सायकली आणून या मोर्चात सहभाग घेतला होता. 
2) तर काहींनी बैलगाडीतून प्रवास करीत आता पेट्रोल डिझेल महागल्याने या गाड्या घरी ठेवून बैलगाडीशिवाय पर्याय नसल्याचे दाखवून दिले.Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image