चिपळे ते मोरबे रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी..
चिपळे ते मोरबे रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी
 पनवेल /वार्ताहर -  : चिपळे ते मोर्बे या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी पनवेल तालुका भाजपचे चिटणीस नामदेव जमदाडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत मंगेश पाटील, रवींद्र पाटील उपस्थित होते. 
        चिपळे ते मोरबे हा रस्ता अतिशय खराब खड्डेमय झालेला आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असल्यामुळे त्याचा त्रास दुचाकीस्वार, रिक्षाचालक व इतर खाजगी वाहनांना होतो. तसेच वाकडी येथे टाकलेले नवीन पाईप खराब झाल्यामुळे त्वरित बदलून देण्याची मागणी करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी या रस्त्याचे साफसफाईचे काम सुरू होते, त्यानंतर महिना उलटून गेला तरी कामाचा पत्ता नाही. तरी या रस्त्याचे व वाकडी येथील पाईप टाकण्याचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी नामदेव जमदाडे यांनी केली आहे. 
Comments