गीता पालरेचा सुधागडच्या विकासाचा चेहरा ; खासदार सुनील तटकरे
कळंबोली (दीपक घोसाळकर) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जे कष्ट उपसले म्हणून आजच्या महिला सक्षम होऊ शकल्या म्हणून आपण आज जागतिक महिला दिन आनंदात साजरे करू शकत आहे. राजकीय पटलावर सत्तास्थानी महिलांना विराजमान करण्यात लोकनेते आदरणीय शरद पवार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे .पाली सारख्या अष्टविनायक तीर्थस्थानाच्या नगरपंचायतिच्या पहिला नगराध्यक्ष्य होण्याचा बहुमान गीता पालरेचा यांना मिळाला आहे. त्यांना मिळालेल्या राजकीय संधीचे त्यांनी सोने केले असून सुधागडचा सर्वांगीण विकास साधण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे. पालीच्या सरपंच, सुधागडच्या सभापती पदाचा अनुभव पाठीशी असल्यानेच गीता पालरेचा म्हणजे सुधागडच्या विकासाचा चेहरा असल्याचे गौरवोद्गार रायगड रत्नागिरी चे खासदार सुनील तटकरे यांनी कळंबोली येथे केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून व शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांचे जयंती निमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ कळंबोलीतील सुधागड विद्यासंकुलात आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रायगडचे भाग्यविधाते व खासदार सुनील तटकरे हे उपस्थित होते. यावेळी सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह व पाली च्या पहिल्या नगराध्यक्षा गीताताई पालरेचा ,संस्थेचे सचिव रविकांत घोसाळकर ,सुधागड विद्या संकुलाचे प्राचार्य व संचालक राजेंद्र पालवे, संस्थेचे प्रशासन अधिकारी मिलिंद जोशी ,राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, सुदाम पाटील ,नगरसेवक सतीश पाटील ,विजय खानावकर , माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, सुधागड विद्या संकुलातील शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमात शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कोकण विभागीय वकृत्व स्पर्धेमध्ये विशेष नैपुण्य पटकावणाऱ्या गुणी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ स्मृतिचिन्ह भेटवस्तू देऊन करण्यात आला .तसेच संस्थेच्या कायर्वाह गीताताई पालरेचा यांनी पाली नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा बहुमान पटकावल्या बद्दल सुधागड विद्यालय संकुलात तर्फे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी सुधागड शिक्षण संस्थेमध्ये ज्या शिक्षक मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रायगड जिल्हा पुरस्कार, रायगड भूषण पुरस्कार व अन्य राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केला आहे त्या कर्मचाऱ्यांचाही यथोचित सन्मान शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्यवाह व पालीच्या पहिल्या नगराध्यक्षा गीताताई पालरेचा म्हणाल्या की मी निवडणूक लढवण्यास तयार नव्हते मात्र तटकरे साहेबांनी प्रेमापोटी केलेल्या आदेशामुळे मी निवडणुकीत अर्ज दाखल करून आज पालीच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला आहे .त्याचे सर्व श्रेय आदिती ताई तटकरे व तटकरे साहेबांना जात आहे. आमच्या शिक्षण संस्थेवर ही मोठ्या आशीर्वादाने शैक्षणिक कामात तटकरे साहेबांचे मोलाचं मार्गदर्शन व योगदान असल्याने आम्ही अधिक जोमाने संस्थेची शैक्षणिक प्रगती करू शकलो .आगामी काळातही असेच प्रेम तटकरे साहेबांचे आमच्यावर राहील असा विश्वास मी व्यक्त करीत आहे. सदरचा कार्यक्रम संस्थेचे सचिव रविकांत घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला.