जागतिक महिलादिनी दुर्मिळ वनौषधी रोपांचे वाटप..
महिला दिनी दुर्मिळ वनौषधी रोपांचे वाटप..

पनवेल / (प्रतिनिधी)                 
        
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेने दुर्मिळ वनौषधींची रोपे भेट देऊन आगळावेगळा महिला दिन साजरा केला.
        सदर कार्यक्रमात आर्या वनौषधी संस्थेचे महेश पाटील, नम्रता पाटील,दिशाली पाटील, रंजना पाटील,ज्योत्स्ना पाटील, कल्पेश पाटील,राजश्री पाटील आदी मान्यवर अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.या  कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी महिलांसाठी उपयुक्त अशा रिठा,शिकेकाई,सीतेचे अशोक,शतावरी,कांचनार,पांढरी मुसळी,लोध्र आदी पन्नास वनौषधी वनस्पतींची सखोल माहिती दिली.
      आर्या वनौषधींच्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला.  यावेळी सीतेचा अशोक,गुडमार, दमवेल,पुनर्नवा,मिरी,लवंग, दालचिनी,ब्राह्मी,निरब्राम्ही,लाल चित्रक,पांढरा चित्रक,रुद्राक्ष, कापूर,केवडा आधी दुर्मिळ  वनौषधींची रोपे महिलांना भेट देण्यात आली.
      वनौषधी तज्ञ सुधीर पाटील यांच्या या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे महिलांनी कौतुक करून पर्यावरण संवर्धनाचे हे वेगवेगळे उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहेत असेही त्यांनी यावेळी बोलून दाखविले.
 
Comments