स्मिता माळी शिक्षक गुणरत्न पुरस्काराने सन्मानित..
स्मिता माळी शिक्षक गुणरत्न पुरस्काराने सन्मानित

कळंबोली / प्रतिनिधी -  : कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या मराठी प्राथमिक विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका स्मिता लक्ष्मण माळी यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व कामगिरी केल्याबद्दल मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे शिक्षक गुणवंत गुणरत्न गौरव पुरस्काराने शानदार कार्यक्रमात मानाचा फेटा ,सन्मानपत्र ,स्मृतिचिन्ह देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. स्मिता माळी यांना पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल शैक्षणिक , सांस्कृतिक ,सामाजिक व राजकीय क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
            स्मिता लक्ष्मण माळी कळंबोलीतील मराठी प्राथमिक विद्यालयात केल्या २५ वर्षापासून सहायक शिक्षिका म्हणून सेवेत कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षात विद्यार्थ्यांवर प्राथमिक शिक्षण देत असताना त्यांच्यामध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, विविध कलागुणांचे संस्कार करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राज्यातील लोकसेवा अकादमीतर्फे त्यांना  शिक्षक गुणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या एका भव्य दिव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी ह-भ-प शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर , ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर , अकादमीचे समन्वयक प्रकाश सावंत , नक्षी गवळी मनीषा कदम तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.समारंभाचे अध्यक्ष रमेश आव्हाड, डॉक्टर महालक्ष्मी वानखेडेकर ,विद्यालयातील सहायक शिक्षकेचा झालेला सन्मान सोहळा हा संस्थेचा व  शाळेचा सन्मान झाल्याचे म्हणून संस्थेचे अध्यक्ष वसंत ओसवाल, उपाध्यक्ष रवींद्र लिमये, कार्यवाह गीता पालरेचा, सचिव रवीकांत घोसाळकर ,विद्या संकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे ,प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता पाटील तसेच शिक्षक वर्गाने त्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments