सव्वा लाखाच्या लॅपटॉपची चोरी ..

सव्वा लाखाच्या लॅपटॉपची चोरी 

 पनवेल / वार्ताहर - : पार्क करून ठेवलेल्या गाडीतून सव्वा लाख रुपयांच्या लॅपटॉपची अज्ञाताने चोरी केली आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

       सेक्टर 10, खारघर येथील सौम्यअंशू सूर्यान्शु सरकार यांनी त्यांची गाडी एम एच 01 ए एल 8310  ही पार्क करून ठेवली होती. बिल्डिंगच्या खाली आल्यावर ते लॅपटॉप घेण्यास गेले असता गाडीच्या मागील बाजूच्या उजव्या बाजूचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांना दिसले. अज्ञात चोरट्याने लॅपटॉपची चोरी केली आहे. 

Comments