मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन

मोफत नेत्र तपासणी , मोफत चष्मे वाटप 


पनवेल / वार्ताहर - : प्रभाग समिती ड सभापती अॅडव्होकेट वृषाली जितेंद्र वाघमारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जय बजरंग मित्रमंडळ, आई माऊली मित्रमंडळ, जय बजरंग महिला मंडळ यांच्या विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप व दिनांक ७ मार्च रोजी अपंग बांधवांना व्हीलचेअर व वॉकिंग स्ट्रीकचे वाटप करण्यात येणार आहे.

जय बजरंग मित्रमंडळाचे हे पंचवीसावे वर्ष आहे. जय बजरंग मित्रमंडळामार्फत रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, पूरग्रस्तांना मदतवृध्द आश्रमांना मदतसाई पदयात्रानवरात्री उत्सवदहीहंडी उत्सव अशा अनेक विविध समाजपयोगी शिबिरांचे आयोजन विनोद वाघमारे व सभापती अँड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांच्यामार्फत केले जातात. या मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप शिबीर यांचा फायदा जास्त जस्त गरजू रूग्णांनी घ्यावा असे आवाहन जय बजरंग मित्रमंडळाचे अध्यक्ष विनोद वाघमारे व सभापती अँड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांनी केला आहे.

Comments