सोन्याचे दागिने खेचून पळणारा सराईत गुन्हेगार गजाआड..
सोन्याचे दागिने खेचून पळणारा सराईत गुन्हेगार गजाआड

पनवेल, दि.3 (संजय कदम) ः पनवेल शहर परिसरात तसेच खांदा वसाहत परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पळणार्‍या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गेल्या काही दिवसापासून पनवेल शहर परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पळून जाणार्‍या इसमाचे गुन्हे वाढले होते. या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि विजय कादबाने व पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे सहा.पो.नि.दळवी, पो.उप.निरीक्षक आकाश शिंदे, पो.हवा.राऊत, परेश म्हात्रे, वायकर, पारासुर, गंथडे, वाघमारे, महेश पाटील, मिसाळ, भगवान साळुंके, देशमुख, घरत आदींच्या पथकाने या संदर्भात त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज व गुप्तबातमीदार यांच्याकडून माहिती घेवून सदर आरोपीचा शोध करीत असताना दिलेल्या वर्णनाचा आरोपी हा एस.टी.स्टॅण्ड परिसरात गुन्हा करण्याच्या उद्देशाने आल्याची माहिती या पथकाला मिळताच त्यांनी सापळा रचून आरोपी आकाश घाडी (25 रा.विचुंबे) याला ताब्यात घेतले आहे व त्याच्याकडून आतापर्यंत 4 गुन्हे उघडकीस आाले आहेत. त्याच्या अटकेमुळे अजूनही चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Comments