खारघर स्वाभिमानी संघटनेतून शिवसेनेत जाहीर प्रवेश ; जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केले स्वागत
 जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केले स्वागत..
खारघर, दि -10 मार्च
जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष प्रवेशाची मालिका सुरू आहे आज पुन्हा एकदा खारघर विभागातील स्वाभिमानी संघटनेचे काही कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी महानगर प्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा  समन्वयक प्रदीप ठाकूर,महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, कळंबोली शहर प्रमुख डी एन मिश्रा, कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी, खांदा कॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्के, खारघर शहर प्रमुख प्रकाश गायकवाड आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
Comments