प्रितम म्हात्रे यांनी नारळ फोडून दिल्या शुभेच्छा
पनवेल : जागतिक महिला दिनाचे औचित साधून महिलांसाठी रविवार 13 मार्च 2022 रोजी शेतकरी कामगार पक्ष कामोठे शहर कार्याध्यक्ष शुभांगी सुरेश खरात व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश पांडुरंग खरात यांच्या सहकार्याने मोफत एक दिवसीय देव दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
या सहलीला सकाळी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते नारळ फोडून आरंभ झाला. कामोठे ते महड गणपती दर्शन अशा प्रकारे नियोजन सौ शुभांगी सुरेश खरात यांनी केले होते.कामोठे मधील साई रचना सेक्टर 21 येथून निघून सकाळी 10 वाजता खोपोली महड अष्टविनायक गणपती दर्शन घेऊन नंतर एस.के.आत्रा फार्म ,मोरबे धारणा जवळ, कर्जत रोड येथे दिवसभरच्या सहलीचे आयोजन केले होते. या वेळी या ठिकाणी महिलांसाठी विविध प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे नियोजन सुद्धा केले आहे. 24 तास बाराही महिने आपल्या कुटुंबासाठी वेळ देणार्या महिलांना एक दिवस स्वतःसाठी मिळावा या उद्देशाने आम्ही या सहलीचे फक्त महिलांसाठी नियोजन केले आहे असे त्यांनी सांगितले.
शेतकरी कामगार पक्षाच्या महिला कार्यध्यक्ष शुभांगी खरात आणि व्यापारी संघटना अध्यक्ष सुरेश खरात यांच्या मध्यामातून कामोठे ते महड गणपती दर्शन या सहलीत कामोठे मधील 400 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला.
यावेळी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासोबत शेकाप जिल्हा चिटणीस आणि नगरसेवक गणेश कडू, नगरसेवक शंकर म्हात्रे, प्रमोद भगत, शहर अध्यक्ष अमोल शितोळे, संघटक अल्पेश माने, शिक्षक आघाडी प्रमुख दशरथ माने, युवा नेते अतुल भगत, महिला शहर अध्यक्षा उषा झणझणे आदी उपस्थित होते.