शेकापच्या आंदोलनाला यश ; महादेव वाघमारे यांच्या खड्डा खोदून निषेध आंदोलनाच्या इशाऱ्याला सिडको नमले..

महानगरगॅस ने खांदा कॉलनीतील पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू 

पनवेल / वार्ताहर : -      खांदा कॉलनीतील संपुर्ण रस्ते खड्डेमय झाले होते , नागरिकांच्या तक्रारीनुसार महादेव वाघमारे शेकाप कार्याध्यक्ष पनवेल यांनी सिडकोला 25 फेब्रुवारी रोजी सिडको कार्यालय नवीन पनवेल कार्यालया समोर 7 मार्च रोजी खड्डा खोदून आंदोलन करणार आहे असे पत्र दिले होते 
      
सिडकोचे अधीक्षक अभियंता  पी बी मोहिले यांनी  सदर आंदोलनाची दखल घेऊन 28 फेब्रुवारी रोजी महादेव वाघमारे यांना पत्र देऊन 15 तारखेपर्यंत काम सुरू करू असे सांगितले होते त्याप्रमाणे सिडकोने आज 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजल्यापासून खांदा कॉलनी सेकटर 9 पासून काम सुरू केले आहे यावेळी सिडको अधीकारी देकाटे, गणेश पाटील माजी उपनगराध्यक्ष पनप ,विजय काळे,योगेश कोठेकर, मंगेश अपराज,अनिकेत भंडारे,सचिन डोंगरे,रमेश पाटील,सुदेश खताटे उपस्थित होते 
 नागरीकांनी महादेव वाघमारे यांचे आभार मानले आहेत.
Comments