क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन आयोजित महिला क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न..
 

लेडीज सिंघम (कामोठे पोलीस) प्रथम क्रमांक तर क्रियाशील प्रेस क्लब द्वितीय क्रमांकाचे मानकरी. उत्तेजनार्थ बक्षीस झोन -2 टीमला. 

पनवेल /प्रतिनिधी : महिला दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी विविध प्रकारचे महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. पनवेलमधील महिलांच्या सक्षमीकरणासाठी व न्याय देण्यासाठी अग्रेसर असलेली क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई शिंदे यांनी महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी क्रिकेटचे सामने आयोजित केले होते. या सामन्यांचे उदघाटन सौ ममता प्रीतम म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सौ.ममता प्रीतम म्हात्रे यांनी देखील क्रिकेट खेळण्याचा आस्वाद घेतला. 
यावेळी पनवेल महापालिकेचे उपायुक्त माननीय श्री  विठ्ठल डाके, उपमहापौर सौ.सीताताई पाटील, नगरसेवक श्री. गणेश कडू, नगरसेविका सौ.सारीका भगत , नगरसेविका सौ. सुरेखा मोहकर, नगरसेविका सौ.दर्शना भोईर, नगरसेविका सौ.राजश्री वावेकर, नगरसेविका सौ.चारुशीला घरत,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला रायगड जिल्हाअध्यक्षा सौ. आदिती सोनार ,सौ. प्रीती खानविलकर, मा.श्री पुरुषोत्तम (नाना) भुजबळ, मा.सौ. निता माळी, मा .सौ. सुहासिनी केकाणे, ज्येष्ठ पदाधिकारी सौ. शोभा सातपुते , ज्येष्ठ पदाधिकारी सौ.अंजली इनामदार ,सौ. निता मंजुळे ,ऍड सौ.सुलक्षणा जगदाळे, राळे , सौ.रोहिणी पाटील ,सौ  वृषाली मिसळ , सौ.रेवतीताई सकपाळ , सौ .मीनाताई सादरे ,सौ.मनीषा देशमुख , सौ सोनाली कुदळे,सौ. प्रभा सिन्हा , सौ.अभिलाषा ठाकूर ,श्री.चंद्रकांत मंजुळे, प्रमोद भगत , मातंगसमाजाचे तालुका अध्यक्ष. श्री सुरेश देढे , यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी झालेल्या सामन्यांमध्ये कामोठे पोलीस ठाणे यांचा लेडीज सिंघम ग्रुपने प्रथम क्रमांक तर क्रियाशील प्रेसक्लब पनवेल यांनी द्वितीय क्रमांक तर झोन -2 या संघाने उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. यावेळी विजेत्यांना भव्य चषक व बक्षीसांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले तसेच वुमन ऑफ द सिरीज कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांना देण्यात आले तर उत्कृष्ठ फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image