वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित..
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित

पनवेल (प्रतिनिधी), -- महाराष्ट्र पोलीस दलातील  उल्लेखनीय कामगिरीबद्दल २०२० या वर्षात जाहीर झालेल्या राष्ट्रपती पोलीस पदकाने राजभवन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांना  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव गृह आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे उपस्थित होते.

१९९२ साली पोलीस दलात उपनिरीक्षक पदी निवड झालेलं गायकवाड हे त्यावेळी ६१९ विद्यार्थ्यांमधून तिसरे आले होते. ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, भिवंडी येथे विविध पोलीस ठाण्यात त्यांनी सेवा बजावली. २०१२ साली पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन त्याना गौरविण्यात आले आहे. पोलीस सेवेत ३५ वर्षे सेवा केलेल्या सतीश गायकवाड याना गायन आणि ट्रेकिंगचा छंद आहे. आतापर्यंत त्यांना ५०० हुन अधिक बक्षिसे मिळाली आहे. या पोलीस पदकाबद्दल मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Comments