बी टेन अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन झाली बी टेन सहकारी गृहनिर्माण संस्था ...
बी टेन अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन झाली बी टेन सहकारी गृहनिर्माण संस्था   
नवीन पनवेल / वार्ताहर -  : बी टेन अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, सेक्टर 13, नवीन पनवेल (पूर्व )या संस्थेचे नवीन नामकरण बी 10 सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित ),सेक्टर 13 नवीन पनवेल असे होऊन ती दिनांक 25  फेब्रुवारी 2022 पासून कार्यरत झाली आहे . सदर नामकरण सोहळा रविवार दिनांक  27 फेब्रुवारी रोजी असोशियनमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सुनील घरत (माजी नगराध्यक्ष) व अनिल  घरत अध्यक्ष, सचिव अजित म्हात्रे, जय भारत जाधव, जनार्दन थळी, सदानंद गावंड, इतर सदस्य बी- 10 अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन यांनी केले.

            बी -10 अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन ही सिडकोने 1980 साली बांधकाम करून 1983 साली लोकांना हस्तांतरण करून रजिस्ट्रेशन केले, तेव्हापासून आज अखेर रहिवाशी राहत आहेत. परंतु सध्या सिडकोने बांधलेल्या सर्व इमारती जीर्ण झालेल्या आहेत, काही इमारतींचे स्लॅब पडणे ,काही कॉलमला तडे जाणे. अशा तक्रारी सतत येत होत्या, म्हणून सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन सदर गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. असोशियनचे अध्यक्ष अनिल घरत व सर्व कमिटी सदस्यांनी पूर्ण वेळ देऊन कामकाज पूर्ण केले. पनवेल महानगरपालिकेमधील सिडको हद्दीतील पहिलीच अशी गृहनिर्माण संस्था आहे यानंतर लवकरात लवकर पुनर्विकास करण्यात येईल. या कार्यक्रमास सर्व पदाधिकारी इमारत प्रतिनिधी पुनर्विकास कमिटी व सर्व घरमालक उपस्थित होते.
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image