15 वर्षीय मुलीचे अपहरण करणार्‍या आरोपीस तळोजा पोलिसांनी घेतले ताब्यात..
15 वर्षीय मुलीचे अपहरण करणार्‍या आरोपीस तळोजा पोलिसांनी घेतले ताब्यात
पनवेल, दि.4 (संजय कदम) ः तळोजा येथे राहणार्‍या एका 15 वर्षीय मुलीचे अपहरण करणार्‍या आरोपीस राजस्थान येथील जि.बारा येथून ताब्यात घतले आहे.
तळोजा परिसरात राहणारी एका 15 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित आरोपीचे मोबाईल कॉल डिटेक्ट व गुप्त बातमीदाराद्वारे अधिक माहिती घेतली असता सदर आरोपी नामे अरविंद मेघवाल याने तिला अंता पोलीस ठाणे, जिल्हा ः बारा, राजस्थान या भागात पळवून नेल्याचे समजले. त्यानुसार सहा.पो.नि.राजेंद्र जाधव, पो.ना.विजय पाटील, अनिल जाधव आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून त्या आरोपीला मुलीसह ताब्यात घेतले आहे. व तळोजा येथे आणून तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


फोटो ः मुलीला ताब्यात घेतल्यासह आरोपीबरोबर तळोजा पोलिसांचे पथक
Comments