1 लाख 48 हजार 999 रुपयाची ऑनलाईन फसवणूक
पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः 1 लाख 48 हजार 999 रुपयाची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
शहरात राहणारे सौरभ मोरे यांना एका अज्ञात इसमाने मोबाईलवर फोन करून इंडियन आर्मी मधून श्रीकांत यादव बोलत असून विणा राऊत यांच्याकडून डायट प्लॅन घेतला आहे व त्यासाठी पेमेंट करायचे आहे. इंडियन आर्मीचे अकाऊंट वेगळ्या प्रकारचे असते. त्यासाठी आपल्याला अगोदर पेमेंट करावे लागते, असे खोटे सांगून व पैसे पाठविले नाही तर इंडियन आर्मीकडून कारवाई करू असे सांगून बोलण्यात गुंतवून त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र अकाऊंटमधून एकूण 99 हजार 999 रुपये फोन पे द्वारे अनोळखी खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. तसेच त्यांच्या एचडीएफस बँकेच्या डेबीट कार्डचे डिटेल विचारुन त्यांच्या मोबाईलवरुन आलेला ओटीपी त्यांच्याकडून घेवून त्यांच्या एचडीएफसी बँक अकाऊंटमधून 49 हजार रुपये अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्सफर करून त्यांची एकूण 1 लाख 48 हजार 999 रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.