दिघाटीत श्री गणेश जन्मात्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन...
दिघाटीत श्री गणेश जन्मात्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन
पनवेल / वार्ताहर : - आमदार महेशशेठ बालदी यांच्या फंडातून गणेश मंडळ सभा मंडपाकरीता १४ लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. त्याबद्दल नवतरूण गणेश मित्रमंडळ यांनी आभार मानले . 

दिघाटी येथील नवतरुण गणेश मित्र मंडळाच्या वतीने गणेश मंदिरात धर्मनाथ बिज प्राणप्रतिष्ठा व गणेश जन्मोत्सव कथात्रिवेणी संगम देव भक्त आणि तीन दिवस हरिपाठ व किर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान हे सर्व कार्यक्रम होणार आहेत. 
यामध्ये पहाटे 4 ते 6 काकडा, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, रात्री 9 ते 11 कीर्तन हरिजागर होईल. या श्रवण सेवेचा, तिर्थ प्रदासाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, दिघाटीचे सरपंच अमित पाटील, साईचे माजी सरपंच आण्णा पाटील, पुंडलिक ठाकूर, रमेश पाटील आदींची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे व्यवस्थापक दिघाटी येथील नवतरूण गणेश मित्र मंडळ, ग्रामविकास परिवर्तन आघाडी, दुर्गादेवी मित्र मंडळ, गुरूवार वाचक मंडळ, ग्रामस्थ मंडळ हे आहेत.
Comments