इसमाचे अपहरण...
इसमाचे अपहरण...

पनवेल / दि.04 (वार्ताहर): एका 28 वर्षीय इसमाचे अपहरण झाल्याची घटना तालुक्यातील पेठ गाव येथे घडली असून याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
           मोहम्मद असलम निझामुद्दीन शेख (वय-23, रा.-पेठ गाव) यांच्या पत्नीचे नातेवाईक नाझिर आलम व त्याच्यासोबत असलेली मुलगी हे लग्न करून त्यांच्या घरात राहण्यास आले होते. यावेळी तीन इसम हे त्यांचा शोध घेत मोहम्मद शेख याच्याकडे आल्यानंतर नाझिर आलम हा त्याच्या पत्नीसह पळून गेला. त्या दोघांना आश्रय दिल्याचा राग या तीन इसमांनी मनात धरून आरोपींनी नाझिर व त्याच्या पत्नीचा शोध घेण्याकरीता मोहम्मद शेख याचा मोठा भाऊ एहसान अली यास टिळकनगर कुर्ला येथे घेऊन जातो असे सांगून त्यास सदर ठिकाणी न नेता त्याचे अपहरण केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments