अखंड भारताचे आराध्यदैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालया समोर उत्साहात साजरा..
अखंड भारताचे आराध्यदैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालया समोर उत्साहात साजरा
पनवेल / वार्ताहर : - सालाबादप्रमाणे यावर्षीही महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयासमोर साजरा करण्यात आला.दरवर्षी शिवजन्मोत्सव हा वेगळ्या आणि अनोख्या प्रकारे साजरा करण्याचा मानस विक्रांत पाटील यांचा असतो.मागील वर्षापासून थेट किल्ले रायगडावरून शिवज्योत नागरिकांच्या दर्शनासाठी आणली जाते.या अनोख्या उपक्रमाचा एक भाग म्हणून मागच्या वर्षी शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते.पनवेलकरांनी या प्रदर्शनास भरगोस प्रतिसाद दिला.यावर्षीही शिवजन्मोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.थेट किल्ले रागडावरून आणलेली शिवज्योत आणि महाराजांच्या जीवनावरील चलचित्र देखावा नागरिकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते.याचबरोबर सायंकाळी महाराजांच्या जीवनावर आधारित दोन खास कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.*शिवकल्याण राजा* महाराजांच्या जीवनावरील आधारित पोवाडे आणि गाण्यांचा कार्यक्रम  प्रभागातील *स्वर आरंभ संगीत अकादमी* च्या होतकरू गायकांनी  सादर केला.छत्रपती शिवाजी महाराज  यांनी अगदी विपरीत परिस्थितीत स्वराज कसे स्थापन केले आणि फक्त लढाया नाही केल्या तर सुशासन स्थापन केले व त्याच बरोबर स्वराज्याच्या रक्षणासाठी गडकिल्ले निर्माण केले आणि त्यांना *समर्थ रामदासांची* कशी साथ लाभली व त्याच बरोबर समर्थांनी त्याकाळी म्हणजेच ३५०-४०० वर्षांपूर्वी उत्तम नेटवर्किंग द्वारा भारतात ११०० मठांची स्थापना आणि त्याकाळी दास बोध आणि मनाचे श्लोक मधील ओव्या आजच्या आपल्या जीवनात कसे तंतोतंत बसतात या विषयावर सुखद अनुभव देणारा *समर्थांचे नेटवर्क* हे वेगळ्या प्रकारचे किर्तन,समर्थ भक्त,कॉर्पोरेट किर्तनकार श्री समीर लिमये यांनी सादर करून आलेल्या सर्व शिवप्रेमी नागरिकांना मंत्रमुग्ध करून टाकले. निरनिराळ्या उपक्रमातून आणि कार्यक्रमातून नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच नागरिकांना काहीतरी चांगलं देण्यासाठी सतत  प्रयत्नशील असतात या बद्दल आलेल्या सर्व शिवप्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
Comments