पनवेलमध्ये नवाब मलिकांविरोधात जोरदार आंदोलन ..
पनवेलमध्ये नवाब मलिकांविरोधात जोरदार आंदोलन 
पनवेल(प्रतिनिधी) नवाब मलिक यांना कोणत्याही राजकीय गुन्ह्यात अटक झालेली नाही तर मुंबई बाँम्ब स्फोटातील आरोपींशी त्यांनी जमिनीचा व्यवहार केला आहे. मलिक यांनी दिलेल्या पैशाचा वापर अंडरवर्ल्डने देशाविरुद्ध केला, अशा देशद्रोह्यांशी नवाब मलिक यांनी सौदा केलाच कसा, असा सवाल करत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी आज पनवेलमध्ये करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणा बाजी करत महाविकास आघाडीतील मंत्री घोटाळे करत सुटले आहेत, सत्तेच्या हव्यासापोटी त्यांना आणि आता नवाब मालिकांना पाठीशी घालण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत असल्याची घणाघाती टीका या आंदोलनातून करण्यात आली. 
           पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, उत्तर रत्नागिरी जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष केदार साठे, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, संतोष भोईर, नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, शशिकांत शेळके, युवा नेते दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, शहराध्यक्ष रोहित जगताप, दिनेश खानावकर, सतीश पाटील, अभिषेक भोपी, वैद्यकीय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. कृष्णा देसाई, राम पाटील, अमरीश मोकल, केदार भगत, अनेश ढवळे, भीमराव पोवार, प्रसाद हनुमंते, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
            
Comments