एसआरएल डायनॉस्टीक सेंटरतर्फे आयोजित मोफत रक्त व नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद
 मोफत रक्त व नेत्र तपासणी शिबिर
पनवेल दि. २7 (वार्ताहर) अत्याधुनिक सोईयुक्त असे  एसआरएल डायनॉस्टीक सेंटर हे पनवेलकरांच्या सेवेसाठी आज पासून सुरु झाले असून, या उदघाटना निमित्त आज सर्वांसाठी मोफत, रक्ततपासणी व मोफत नेत्र तपासणी हा उपक्रम राबवला होता. त्याला पनवेलकरांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.        
या शिबिरास अनेक गरजू नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी अनेक नामांकित डॉक्टरांनीसुद्धा उपस्थिती लावली होती. आगामी काळातही दर महिन्याला दोनदा अशा प्रकारे मोफत शिबिर राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या संस्था, संघटना यांना अशा प्रकारे उपक्रम राबवायचे असतील त्यांनी  शॉप नं.8, प्लॉट नं.123, गुरुकृपा अपार्टमेंट, एमटीएनएल समोर, मिडलक्लास हौसिंग सोसायटी पनवेल येथे संपर्क साधावा असे आवाहन लॅब डायरेक्टर जसोल सुभाषचंद्र बांठीया भ्रमणध्वनी 8828882626 यांनी केले आहे.
          

 फोटो: रक्त तपासणी करून घेताना
Comments