शिवसेना पनवेल उपमहानगर संघटकपदी अच्युत मनोरे यांची वर्णी..
शिवसेना पनवेल उपमहानगर संघटकपदी अच्युत मनोरे यांची वर्णी..

पनवेल दि.15 ( अनिल कुरघोडे ) : - शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशानुसार, रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्यावतीने शिवसेना पनवेल उपमहानगर संघटकपदी अच्युत मनोरे यांची नियुक्ती करण्यात आली.

अच्युत मनोरे यांनी दोन वेळा नगरसेवक पद भूषविले आहे.त्याचप्रमाणे शहरसंघटक, पनवेल शहरप्रमुख पद त्यांनी भूषविले आहे.त्यांच्या या अनुभवाचा निश्चितच भविष्यात येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीत पक्षाला फायदा होणार आहे. यावेळी मनोरे यांनी सांगितले की येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या या नेमणुकीदरम्यान तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका विधानसभा संघटक भरत पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, महानगर संघटक प्रथमेश सोमण, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, प्रदीप ठाकूर , पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव, विधानसभा अधिकारी पराग मोहिते,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments