विरेंद्र म्हात्रे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे’ पुरस्काराने सन्मानित..
विरेंद्र म्हात्रे  ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे’ पुरस्काराने सन्मानित
 पनवेल वैभव वृत्तसेवा : - नेरुळ नोडमधील युवा नेते लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र यशवंत म्हात्रे यांच्या मागील दोन वर्षात कोरोना महामारीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत युथ फोरम सोशियल असोसिएशन या सामाजिक संस्थेच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे’ पुरस्कार ने विरेंद्र म्हात्रे यांना गौरविण्यात आले आहे.

देवीचा पाडा पनवेल या ठिकाणी झालेल्या सन्मान सोहळामध्ये युथ फोरम सोशियल असोसिएशन या सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजित संस्थेचे अध्यक्ष केवल गायकवाड,  याल तर हासाल यात संजीवन म्हात्रे यांच्या हस्ते विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे’ पुरस्कार २०२२’ने सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमात लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई करत असलेल्या उल्लेखनीय जनताहितैषी कार्याचीही दखल युथ फोरम सोशियल असोसिएशन या सामाजिक संस्थेकडून घेण्यात आली. लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई या सामाजिक संघटनेलाही पुरस्काराने गौरविण्यात आले. लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईच्या सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्विकारला.

या कार्यक्रमात सदर कार्यक्रमासाठी गणेश म्हात्रे, नरेश सुरेश गायकवाड, आकाश देशमुख, मनोज कडू, सुरज यादव, ऋषिकेश शिंदे, प्रमोद मंडळ, रवी जाधव, अमोल गायकवाड, नागेश गायकवाड, महेश गायकवाड यांनी व युथ फोरम सोशियल असोसिएशन या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image