नवप्रवाह फाउंडेशन तर्फे महिलांना व्यावसायिक मार्गदर्शन व हळदी कुंकू समारंभ संपन्न..

नवप्रवाह फाउंडेशन तर्फे महिलांना व्यावसायिक मार्गदर्शन व हळदी कुंकू समारंभ संपन्न

पनवेल वैभव वृत्तसेवा : -  नवप्रवाह फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून दि. ५/०२/२०२२ रोजी कळंबोली सेक्टर ३ येथे महिलांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला.     
नवप्रवाह फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्षा अरुणा सावंत यांनी कार्यक्रमाचे स्वरूप आणि संस्थेची माहिती दिली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कॅप्टन अंशु अभिजीत उपस्थित होते .

नवप्रवाह संस्थेच्या माध्यमातून महिला कोणत्या प्रकारचा गृह उद्योग करू शकतात या संदर्भात चर्चा करण्यात आली. महिलांना घरगुती मसाले, अगरबत्ती, कापडी पिशव्या बनविणे या विषयांवर कॅप्टन अंशु अभिजीत यांनी मार्गदर्शन केले. तसेच महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मिती उपलब्ध करून देऊ शकतो या बाबत विचार विनिमय करण्यात आला.विशेषतः या हळदी कुंकू  कार्यक्रमात विधवा महिलांना विशेष महत्व देण्यात आले. त्यांचा सन्मान करण्यात आला.सर्व महिलांना हळदी कुंकू, तीळ लाडू ,फुले आणि भेटवस्तू देण्यात आले.यावेळी वस्तीतील 65 महिलांची उपस्थिती लाभली. सर्व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

सदर कार्यक्रमाला विशेष सहकार्य नवप्रवाह संस्थेचे सचिव संदेश महाडिक आणि सभासद मीना राय, सुरेखा मोटे, सुवर्णा चव्हाण यांचे सहकार्य लाभले.
Comments