रबाळे येथून चोरी झालेली स्कुटी खारघर वाहतूक पोलिसांनी केली हस्तगत..

रबाळे येथून चोरी झालेली स्कुटी खारघर वाहतूक पोलिसांनी केली हस्तगत


पनवेल : रबाळे येथून चोरी झालेली स्कुटी खारघर वाहतूक पोलिसांनी हस्तगत केली आहे. खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांनी पोलीस नाईक सुरेश कासार व पोलीस अमलदार मयुर पाटील यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आहे.

         खारघर वाहतूक पोलीस नाईक सुरेश कासार व अमलदार मयुर पाटील हे नेहमीप्रमाणे खारघर शहरामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये या करिता मोटर सायकलवरून गस्तीवर असताना उत्सव चौक, सेक्टर ५ जवळील डोंगरी गवतात एक निळ्या रंगाची होंडा एक्टिवा स्कुटी धूळ खाऊन पडलेली दिसून आली. स्कूटीचे सीट लॉक तुटलेले होते व पेट्रोल लॉकही तुटलेले होते. स्कुटीचा नंबर एमएच वीके ९३३८असा असून सदर पोलिसांनी गाडीचा नंबर तपास करता गाडीचा नंबर चुकीचा असल्याचे वाहतूक अंमलदार मयुर पाटील यांना कळाले. मग त्यांनी गाडीचा चेसिस नंबर व इंजिन नंबर या दोन्ही नंबरची चौकशी जवळील होंडा शोरूममध्ये तपास केला असता त्यांना गाडीचा खरा नंबर एमएच ४३ बीवी ७९१९ व गाडी मालक दिनेश कुमार पटेल (राहणार रबाळे) त्यांच्या नावावर असल्याचे कळाले. त्यांनी ताबडतोब फोन करून दिनेश पटेल यांना गाडीची ओळख पटवण्याकरता खारघर येथील वाहतूक शाखेजवळ बोलावले. दिनेश पटेल यांनी गाडी बघताच ही माझी स्कुटी आहे असे खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  योगेश गावडे यांना सांगितले. व दिनेश पटेल यांनी स्कुटी ३१ डिसेंबर २०२१ रोजी उशिरा रात्री सक्षम सोसायटी रबाळे येथून चोरी झाल्याचे सांगितले. त्यानी १ जानेवारी २0२२ रोजी याची तक्रार  रबाळे  पोलीस ठाण्यात नोंदवली.

           खारघर वाहतूक पोलिसांनी रबाळे पोलीस ठाण्यात चौकशी केली असता त्या गाडीचे नोंद असल्याचे रबाळे पोलिसांनी सांगितले. पुढील संपूर्ण तपासणी करून दिनेश पटेल यांचा मोठा भाऊ शंकरलाल पटेल यांना ही गाडी दिनांक १३ फेब्रुवारी२०२२  या दिवशी रबाळे पोलीस अंमलदार प्रकाश पाटील यांच्या साथीने देण्यात आली. खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांनी पोलीस नाईक सुरेश कासार व पोलीस अमलदार मयुर पाटील यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.


Comments
Popular posts
शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी "आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावून महापालिका लढ्याच्या मोहिमेची केली सुरुवात...
Image
एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले सांत्वन ....
Image
शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न...
Image
वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन पनवेल तालुका पोलीस ठाण्याने उभारले सूचना फलक...
Image
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते व जुने विजेचे खांब त्वरित बदलण्याची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या युवासेने तर्फे पनवेल महानगरपालिकेकडे मागणी..
Image