"मॉंटेरिया व्हिलेज, एक अभिनव प्रयोगशील ठिकाण, शहरी प्रवाशांच्या स्वागताकरिता सज्ज"
'मुंबई आणि पुण्याबाहेर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी एक नवीन पर्याय - ‘द व्हिलेज'
"व्हिलेजमध्ये एक दिवस राहून तेथील कला, लोककला सादरीकरण तसेच अन्य पर्यायांसोबत समृद्ध संस्कृतीची मजा घ्या एक दिवस शेतकऱ्याचे जीवन जगून व्यापक अनुभव घ्या निसर्गासोबत नाळ जोडा आणि मुळांशी नाते दृढ करा"..
पनवेल / प्रतिनिधी : - रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे सुमारे 35 एकर विस्तारलेल्या जागेत, मुंबई आणि पुण्यापासून अगदी दोनच तासांच्या अंतरावर मॉंटेरिया व्हिलेज नव्याने सुरू करण्यात आले आहे.
हा ब्रँड सर्वच वयोगटातील पाहुण्यांसाठी दिवसभर नवीन-डे-आऊटींग डेस्टीनेशन ठरतो आहे. एका गावात येणारे सगळेच अनुभव इथे येऊन घेता येतात. पाण्यात डुंबण्याकरिता तलाव, डोळे मिटून पडून राहण्यासाठी टांगण्यात आलेला झूला, लोकसंगीताचा आनंद देणारे सादरीकरण, आरोग्यदायी देशी आहार, मन रमवणाऱ्या बांबू आणि खाट विणकाम कलांची अनुभूती किंवा नेम धरायला लावणारा लगोरीचा खेळ अशी गंमत इथे अनुभवायला मिळणार आहे.
आठवड्याच्या धकाधकीतून क्षणभर वेळ काढून शहरालगत विकएंडची धमाल करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. इथे येऊन ग्राम संस्कृतीचा आनंद कला, संस्कृतीच्या माध्यमातून घेत, शेतातील पारंपरिक कामासोबत निसर्गाच्या संगतीत राहायला मिळते.
मॉंटेरिया रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापक संचालिका राही वाघाणी म्हणाल्या की, “मॉंटेरिया व्हिलेजमध्ये प्रवेश करताच क्षणी पाहुणे गावच्या आठवणीत रममाण होतात. दिवसभर शेतकऱ्याचे जीवन जगण्याची संधी त्यांना मिळते, शिवाय घरगुती जेवणाची लज्जत चाखता येते. लगोरीचा डाव, झुल्यावर झोके घेण्याचा आनंद, तलावात पोहणे आणि तणावमुक्त जीवन निसर्गाच्या सानिध्यात जगता येणार आहे. त्यातच कौशल्यपूर्ण कारागीर आणि कामगारांच्या हाताखाली सर्जनशीलता जपण्याचा अनुभवही घेता येईल. शहराच्या वेगातून ‘फुरसत’ मिळवून दोन क्षणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी, आपल्या जीवलगांसोबत एकत्र क्वालिटी टाईम व्यतित करण्यासाठी हा उत्तम पर्याय ठरतो.”
तल्लीन करणारा कला अनुभव
याठिकाणी सुतार, फर्निचर घडवणारे, शिंपी, कुंभार, धातू तसेच दगडी काम करणारे कारागिर, बांबू आणि खाट विणकाम करणारे, लोहार, कातडी कमावणारे आणि सोनारांसोबत काम करता येईल. स्वत: कामाचा अनुभव घेऊन इथे तयार करण्यात आलेली कलाकृती सोबत नेता येणार आहे. त्याशिवाय न्हाव्याकडून केसांचा छानसा हेअर कट करता येईल, चंपी, मसाज करून घेता येईल. याठिकाणी महिला गृहउद्योगाद्वारे विक्रेत्यांनी तयार केलेल्या चविष्ट आणि लज्जतदार पापड, लोणची तसेच श्रीखंडाचा आनंद घेता येणार आहे.
शेतात वेळ घालवणे
मॉंटेरिया व्हिलेजचा कृषी भविष्यावर विश्वास आहे आणि त्यांनी शेतीच्या जुन्या पद्धतींसोबत हायड्रोपॉनिक्ससारख्या आधुनिक तंत्राचा अवलंबही केला आहे. पारंपरिक ग्राम तंत्रात बायोगॅस, गांडूळखत निर्मिती, शेण्या थापणे, गोमूत्र गोळा करणे तसेच ग्रीनहाऊसमध्ये फुलांची शेतीचा समावेश आहे. पर्यटकांना सर्वसमावेशक पद्धतीच्या धन्वंतरी गार्डनसारख्या शेतीविषयक अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल किंवा शेतातील ताज्या उत्पादनाचा गंध अनुभवण्यासाठी फेरफटका मारता येणार आहे.
अन्नपदार्थ आणि पेयपान
इथल्या मोकळ्या हवेत भटकंती करताना भूकेची जाणीव झाल्यास स्थानिक ठेल्यांवर चवदार पाणी पुरी, तोंडाला पाणी आणणारे चपटे चणे आणि चटकदार चाटप्रकार चाखता येतील. बर्फाचा गोळा आणि मडक्यातील दही मौज गारेगार करतील. तर तहान भागवण्यासाठी नारळपाणी, बडीशोप पाणी, कोकम सरबत, गोटी/मार्बल सोडा, ताक किंवा कटींग चहा/कॉफीचा पर्यायही असेल.
रेस्टॉरंट साबराजमध्ये घरगुती चवीचे शाकाहारी आणि मांसाहारी जेवण घेता येईल. त्यासाठी शेतात पिकवलेल्या भाज्या किंवा मांस, गहू-बाजरी/ज्वारी आणि तांदळाच्या पोळ्या/भाकऱ्या, डाळ-भात, कढी-भात व पारंपरिक गोड पदार्थ ताटात वाढले जातील.
येथील मुख्य आकर्षण
याठिकाणी असलेली नक्षत्र बाग डोळ्यांना भुलवणारी आहे. अवकाशातील 12 नक्षत्रे किंवा राशी चिन्हांवर आधारलेली आहे. इथे प्रत्येक पाहुण्यांना निसर्गातील सकारात्मक स्पंदने अनुभवता येतील.
दीर्घ प्रवासाच्या आठवणीत नेणारी ग्रीन ट्रेन, स्विंग सर्कल आणि जायंट हारनेसची धमाल पोटात फुलपाखरं उडत असल्याचा भास निर्माण करतील, शिवाय बुलेट चकडोची रपेट मन प्रफुल्लित करेल. इथे फिरत असताना गुंफेतून भटकंती करता येईल. शिवाय बांबूच्या मचाणावर शांतीचा आनंद मिळेल. इथे लक्ष्मण झुल्याची प्रतिकृती देखील पाहता येईल.
मॉंटेरिया व्हिलेज आपल्याला लहानपणीच्या आठवणीत रममाण करेल. त्याचप्रमाणे लगोरी, गोट्या खेळणे किंवा टायरमागून पळणे भूतकाळात घेऊन जाईल.
संध्याकाळच्या रम्य वातावरणासाठी इथे आनंद मेळ्याचा आनंद घेता येईल. लोकसंस्कृतीचे दर्शन सोबतच मनोरंजन करणारे क्रियाकलाप दिवस साजरा करतील. येथील अँफी थिएटरमध्ये लोककलेचे सादरीकरण होते, ज्यामध्ये लोकसंगीतासोबत, नृत्य आणि रंगमंचीय कलांचा आनंद घेता येईल. हा सामाजिक संवादाचा, घरच्या मायेची ऊब देणारा सोहळा आहे.
प्रेक्षक- लक्ष्य
मॉंटेरिया व्हिलेजमध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे. ही ठिकाण प्रत्येक वयोगटाच्या दृष्टीने साजेसे आहे. इथल्या खुल्या वातावरणात मुलांसाठी बरेच क्रियाकलाप, झोपाळे, फिरण्याचे ट्रॅक आणि ज्येष्ठ नागरिकांना गुंतवून ठेवणारे, आरामदायक पर्याय आहेत. हे ठिकाण कॉर्पोरेट पार्टी, चर्चासत्रे आणि ऑफ-साईट भटकंतीकरिता योग्य आहे. इथे अभिनव पद्धतीने संकल्पना राबविण्यात आली असून व्यक्तिगत वेळेची सुसूत्र आखणी टीम-बिल्डिंगला प्रोत्साहन मिळते. या ऑफबीट ठिकाणी जोडप्यांना परस्पर नाते दृढ करण्याची संधी मिळते. खुल्या वातावरणात पारंपरिक आहार उपलब्ध असून एकावेळी 1500 पर्यटक लाभ घेऊ शकतात.
स्वच्छता
सध्याचा महासाथीचा काळ लक्षात घेता, याठिकाणी स्वच्छता विषयक सर्व खबरदारी घेण्यात आलेली असून पाहुण्यांच्या सुरक्षेची हमी राहते. येथील सर्व कर्मचारी वर्गाने लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पर्यटकांना प्रवेश घेताना, बुकिंग दरम्यान लसीकरण प्रमाणपत्रे सादर करावे लागेल. सर्वच थांब्यांवर हात निर्जंतुक करण्याची सुविधा आहे.
इथल्या परिसरात प्रवेश घेताच क्षणी तुम्ही या गावाचा एक भाग होऊन जाता..
आम्ही तुमच्यासाठी सज्ज आहोत.
मॉंटेरिया व्हिलेजमध्ये सर्व-समावेशक पॅकेजची सुविधा असून त्यात सकळचा नाश्ता, दुपारचे जेवण, चहा आणि मॉंटेरिया व्हिलेज अनुभवाची सुविधा आहे. प्रती दिवस माशी खर्च रु 999 (मूल), रु 1499 (ज्येष्ठ नागरीक) आणि रु 1699 (प्रौढ) याप्रमाणे दर आहेत.
नोंदणीची माहिती: www.monteriavillage.com
मॉंटेरिया व्हिलेजविषयी
मॉंटेरिया व्हिलेज हे एक पर्यटकांना अभूतपूर्व अनुभव देण्यासाठी निर्माण करण्यात आलेले आदर्श ग्राम जीवनावर आधारलेले ठिकाण आहे. हे रायगड जिल्ह्यातील खालापूर शहरात सुमारे 36 एकरवर विस्तारलेले आहे. इथे निसर्गाच्या सानिध्यात पर्यटकांना भारतीय गावातील नियमित जीवनासोबत संस्कृती, आहार वैविध्य, मनोरंजन, कला आणि परंपरेचा आनंद घेता येईल. इथे येऊन प्रत्येक वयोगटातील व्यक्ती पुन्हा बालपणात रमेल आणि मुळाशी जोडली जाईल. मॉंटेरिया व्हिलेज हा मुख्य हॉस्पिटलिटी फर्म Monteria Resort Pvt. Ltd. चा भाग असून मुंबईलगत असलेल्या लोकप्रिय रिसॉर्टपैकी एक आहे.