१७ वर्षीय बेपत्ता मुलीला शहर पोलिसांनी काढले शोधून..
१७ वर्षीय बेपत्ता मुलीला शहर पोलिसांनी काढले शोधून
पनवेल, दि.15 (संजय कदम)- कौटूंबिक वादातून कोणास काही एक न सांगता घराबाहेर पडलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयिन मुलीस पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून तिच्या आईकडे तिला सुपूर्त केले आहे.
       तालुक्यातील काळुंद्रे येथे राहणारी एक 17 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटूंबियांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार, पोलिस उपनिरीक्षक अभय शिंदे, पोहवा राऊत, पोना परेश म्हात्रे, पोना वायकर,पोना पारासूर, पोना देशमुख, महिला पोलिस कॉन्स्टेबल बनसोडे आदींच्या पथकाने सदर तरूणीचा असलेला मित्र परिवार यांच्याकडे चौकशी केली. बेपत्ता झालेली मुलगी ही मोबाईल वापरत नव्हती. तिच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार तिची एक जवळची मैत्रिण बेलापूर गाव येथे राहत असल्याची माहिती मिळाली. तांत्रिक तपास व इतर माहितीच्या आधारे सदर मुलीच्या घराचा शोध घेतला असता बेपत्ता झालेली मुलगीसुद्धा तेथे आढळून आली. त्यानुसार या पथकाने सदर मुलीस ताब्यात घेऊन पनवेल शहर पोलिस ठाण्यात आणले व तिच्या कुटूंबियांकडे तिला सुपूर्त केले आहे.        

फोटोः बेपत्ता मुलीसह पोलिस पथक
Comments