स्व.खांडगे बाबांना पुण्यतिथी निमिताने भावपूर्ण श्रद्धांजली
पनवेल / वार्ताहर : - कामोठे शहरातील जडण घडणीत अखंड हरिनाम सप्ताह असो की गणेशोत्सव महाशिवरात्री उत्सव कायम सामाजिक कार्यात स्वतःला झोकून घेणारे खांडगे बाबा हिंदुस्थान लिव्हर नामांकित कंपनीतून सेवा निवृत्ती नंतर कामोठे शहरात केलेली जमापुंजी लावून घर घेऊन कुटुंबाला नव्या दिशेने घेऊन निघाले आणि वडाळा मुंबई येथून कामोठे येथे आलेले बाबा वारकरी संप्रदाय सोबत जोडले गेले.
अखंड हरिनाम सप्ताह विनापूजन पासून कालाप्रसाद दिंडी सोहळा पर्यंत मिळेल ती सेवा करणे .मंडपात ताडपत्री अंथरने पाणी आचारींना मदत करणे भोजन व्यवस्था असो जातीने सहकार्य करत ना कुठे नाव पुकारणे मोठे पण ना- मान सन्मान बस फक्त सामाजिक कार्याची आवड मुळगाव जुन्नर असलेले श्री क्षेत्र वडज खंडेराय मंदिर हे प्राचीन मंदिर आहे सेवा निवृत्ती नंतर गावी असताना वडज मंदिर ठिकाणी सेवा करण्यास जात असे . मंदिर परिसरात झाड लोट करणे झाडांना पाणी घालणे साफ सफाई करणे दुरून येणाऱ्या भाविकांना मदत करणे तळी भांडार करणे आणि भक्तांना खंडेराय माहिती सांगणे हा पाठ नित्याचा असायचा . सामाजिक कार्याची आवड असल्याने मुंबईत वास्तव्यास असताना आपत्कालीन काळात वडाळा ठिकाणी जमावबंदी काळात कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलीस बांधवाना घरून शिदोरी नेत असत तसेच धार्मिक आवड असल्याने छत्रपती शिवाजी महाराज मंडई वडाळा गणेशोत्सव दरम्यान सक्रिय सहभाग घ्येत असत .नागेश्वर सेवा मंडळ नवरात्र उत्सव देवीची मनोभावे सेवा करायचे गोदी कामगार वारकरी सांप्रदाय सोबत कार्य करत असताना बाबा भालदार चोपदार ची भूमिका करत भारूड मध्ये भाग घ्येत .एके काळी मुंबईत झालेल्या दंगलीत शिवसेना कार्यकर्त्यांवर झालेल्या गुन्ह्या दरम्यान एक पाऊल पुढे टाकून जामीनदार होण्यास कायम अग्रेसर असत . दरम्यान जातीय सलोखा कसा राहील यासाठी आग्रही असत .
घरच्या गरिबीमुळे १९६४ साली मुंबई ला नशीब आजमाविण्या साठी आलेले खांडगे बाबा सुरुवातीला शिवनेरी पतसंस्था येथे १० रुपये पगारावर कामाला लागले खानावळीत जेवायची सोय असून राणीबागचा फुटपाथवर बिछाना टाकून झोपत असत अथक हाल परिश्रम करून हिंदुस्थान लिव्हर अशा नामांकित कंपनीत रुजू झाले प्रामाणिक सेवा करून बाबा २०१० साली सेवा निवृत्त झाले नंतर पुढील आयुष्य सामाजिक आध्यात्मिक कार्यात सामावून गेले .पांढरा शुभ्र शर्ट पंधरा पायजमा मजबूत शरीरयष्टी पिळदार मिशा कपाळावर भंडारा अशा खंडेरायाचा भक्ताला कामोठे लोक खांडगे बाबा म्हणत असत जो आवडे देवाला तोचि आवडे देवाला याच नियमाला अनुसरून २०१८ साली हृदयविकाराच्या धक्याने बाबा आपल्यातून निघून गेले . अशा सामाजिक कार्याचे पुजारी खांडगे बाबाना भावपूर्ण श्रद्धांजली .