गुळसुंदे-आकुलवाडी रेल्वेफाटक येथे सब-वे पूल बांधण्याची अभिजीत पाटील यांची मागणी..


गुळसुंदे ग्रामपंचायतीच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष..

पनवेल / वार्ताहर : - रायगड जिल्ह्यातील धावणाऱ्या कोकण रेल्वेवर पनवेल ते पेण दरम्यान असलेल्या 
गुळसुंदे – आकुलवाडी रेल्वे फाटक येथे सब – वे पुल बांधण्यात यावा अशी मागणी मध्य रेल्वेचे झेड.आर.यू.सी.सी. सदस्य अभिजीत पाटील यांनी जनरल मॅनेजर मध्य रेल्वे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत अभिजीत पाटील यांनी जनरल मॅनेजर, मध्य रेल्वे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, " ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे ता.पनवेल यांनी दिनांक ०१/१०/२०१८ रोजी गुळसुंदे-आकुलवाडी रेल्वे फाटक येथे सब - वे पुल बांधण्यात यावा या विषयासंदर्भात अर्ज केला होता परंतु या विषयावर प्रशासनाकडुन लक्ष दिले जात नाही, तसेच इतर रेल्वेफाटकाचे गेट रेल्वे पास झाल्यानंतर लगेचच २ ते ३ मिनीटात उघडतात. परंतु गुळसुंदे-आकुलवाडी रेल्वेफाटकाचे गेट जवळजवळ २० ते २२ मिनिटे बंद असतो. 
रेल्वे, पोसरी रेल्वे स्टेशन तसेच आपटा रेल्वे स्टेशन पास झाल्यानंतरच सदर रेल्वेफाटकाचे गेट उघडले जाते त्यामुळे कामावर जाणारे आजारी व्यक्ती / रूग्णवाहीका, गरोदर महिला विद्यार्थी, मोळी विकायला जाणा-या अदिवासी महिला यांना खुप वेळ ताटकळत उभे रहावे लागते. परिणामी कामगारांना वेळेत कामावर हजर होता येत नाही, आजारी व्यक्तीना वेळेवर दवाखान्यात नेता येत नाही. अशा अनेक समस्या निर्माण होतात.

सदर बाबतीत आपण तातडीने लक्ष दयावे व लवकरात लवकर सब-वे पूल बांधण्यात यावा. तसेच सब-वे पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत उपरोक्त रेल्वे फाटक अद्ययावत करून उघडण्याचा वेळ कमीत कमी करावा. अशी मागणी अभिजीत पांडुरंग पाटील, झेड.आर.यू.सी.सी. सदस्य, मध्य रेल्वे यांनी केली आहे.
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image