कामोठे नोड साठी स्वतंत्र अग्निशमन केंद्रासाठी कामोठे कॉलोनी फोरमची मागणी..
कामोठे नोड साठी स्वतंत्र अग्निशमन केंद्रासाठी कामोठे कॉलोनी फोरमची मागणी.
पनवेल / प्रतिनधी : - कामोठे शहरामध्ये दि ०१ /०२/२०२२ रोजी सेक्टर ११ येथील स्वस्तिक प्लाझा इमारती मधील तळमजल्यावरील हॉटेलमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन मोठया प्रमाणात आग लागली . ह्या घटनेमध्ये तळमजल्यावरील हॉटेलचे तसेच पहिल्या मजल्यावरील दोन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . आग लागल्यानंतर सतर्क नागरिकांनी कळंबोली येथील अग्निशमन केंद्रास आगीच्या घटनेबाबत कळविले . कळंबोली नोडमधून अग्निशमन दलाने येऊन आग आटोक्यात आणली . असे असले तरी कळंबोलीतून कामोठयात पोहचण्यास वाहतूक कोंडीतुन मार्ग काढण्यास अर्धा तास लागल्यामुळे तळमजल्यावर लागलेली आग पहिल्या मजल्यापर्यंत पोहचली होती. अशा वेळी कामोठेला अग्निशमन केंद्र असते तर मदत लवकर पोहचून पहिल्या मजल्यावरील दोन घरांचे नुकसान झाले नसते . 
त्यामुळे ह्या घटनेची गंभीर दखल घेत जवळपास ७५ हजार मालमत्ता आणि  २ लाख लोकसंख्या असलेल्या कामोठे शहरासाठी तातडीने अग्निशमन केंद्र मंजूर करून लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची मागणी करत कामोठे कॉलोनी फोरमच्या सदस्यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी , महापालिका उपायुक्त विट्ठल डाके ह्यांची भेट घेऊन अग्निशमन केंद्राबाबत मागणीचे निवेदन दिले.
ह्यावेळी कामोठे कॉलोनी फोरम अध्यक्ष मंगेश अढाव, महिला अध्यक्ष जयश्री झा, रंजना सडोलीकर, बापू साळुंखे , राहुल बुधे अणि अरुण जाधव ह्यांनी महापालिका उपयुक्त विट्ठल डाके ह्यांची भेट स्वतंत्र अग्निशमन केंद्राबाबत सविस्तर चर्चा केली तसेच अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची  मागणी केली.  ह्यावेळी पनवेल महापालिका क्षेत्रासाठी मध्यवर्ती अग्निशमन यंत्रणा केंद्र कामोठे येथे उभारण्याचे पालिकेचे नियोजनअसल्याची माहिती उपायुक्त विट्ठल डाके ह्यांनी दिली. तसेच डॉ. सखाराम गारळे, नारायण आपटे साहेब , नीलकंठ चोडणकर ह्या टिमने फोरमच्या वतीने सिडको एम डी संजय मुखर्जी ह्यांची भेट घेतली, त्यावेळी सिडको एम डी ह्यांनी दखल घेत पुढील कारवाईसाठी संबधितांना सुचीत केले. ह्यावेळी फोरमच्या वतीने  मंत्रालयातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अणि नगरविकास मंत्री कार्यालयाकडे स्वतंत्र अग्निशमन केंद्राच्या मागणीचे निवेदन दिले.
Comments