गेटवे टर्मिनल्स इंडिया(जीटीआय)पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गुंतवणूक करणार
पनवेल(प्रतिनिधी) एपीएम टर्मिनल्स मुंबई म्हणजेच गेटवे टर्मिनल्स इंडिया अर्थात जीटीआय पायाभूत सुविधा विकासासाठी ११५ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार असून त्यामुळे कंटेनर हाताळणी क्षमता वाढणार आहे. कंपनी शिप-टु-शोअर (एसटीएस) क्रेन्स आणि रेल माउंटेड गँट्री (आरएमजी) क्रेन्समध्ये गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक जीटीआयला ग्राहकांच्या अधिक मोठ्या व्हेसल क्षमतेशी संबंधित बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी केली जात आहे. या गुंतवणुकीसह जीटीआयची कंटेनर हाताळणी क्षमता १० टक्क्यांनी वाढून २. १८ दशलक्ष टीईयूजवर जाईल.
गुंतवणुकीमागचे कारण उलगडताना जीटीआयचे सीओओ श्री. गिरीश अगरवाल म्हणाले, ‘या गुंतवणुकीमुळे आम्हाला अधिक मोठ्या व्हेसलची सुरक्षितता आणि आमच्या टर्मिनलची कार्यक्षमता वाढवता येईल. याची आमच्या ग्राहकांना भारतीय व्यापाराच्या दिशेने कार्यकारी क्षमता वाढवण्यातही मदत होईल.’
गिरीश अगरवाल यांच्या मते, ‘टर्मिनलचा हा उपक्रम सरकारच्या ‘व्यवसाय करण्यात सुलभता आणण्याच्या’ धोरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकणारा आहे.’ जीटीआय हे एपीएम टर्मिनल्स आणि देशांतर्गत रेल ऑपरेटर कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (कॉनकॉर) यांच्या संयुक्त भागिदारी असून ती न्हावा शेवा येथे कार्यरत आहे. टर्मिनलमध्ये २२३६ फुटांची बर्थ लाइन, १२८ एकर्सची यार्ड जागा आणि आधुनिक सेवा उपकरण – १० ट्विन- लिफ्टिंग क्वे क्रेन्ससह, ४० रबर- टायर गँट्री क्रेन्स आणि तीन रेल- माउंटेड क्वे क्रेन्स यांचा समावेश आहे.