कातकरी उत्थान अंतर्गत सप्तसुत्री कार्यक्रमात आदिवासींना जातीचे दाखले वाटप ..
कातकरी उत्थान अंतर्गत सप्तसुत्री कार्यक्रमात आदिवासींना जातीचे दाखले वाटप  

पनवेल दि.18 (वार्ताहर): जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांचे निर्देशान्वये कातकरी उत्थान अंतर्गत सप्तसुत्री कार्यक्रमामध्ये पनवेल तालुक्यामधील 1 हजार 850 कातकरी जातीचे दाखले तयार करण्यात आले. त्याचे वाटप उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्याचे हस्ते आखाडावाडी, कल्ले, तालुका पनवेल येथून सुरवात करण्यात आली . यावेली तहसीलदार विजय तळेकर यांच्यासह तलाठी, मंडळ अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

आदिवासी बांधवांचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थर उंचावण्याच्या दृष्टीने विविधांगी लोकाभिमुख व जनकल्याणकारी शासन योजना तळागळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची प्रक्रीया कातकरी उत्थान अभियान अंतर्गत सुरु आहे. कातकरी लोकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी “कातकरी उत्थान योजना” ही योजना आणली आहे. या योजनेमुळे कातकरी समाजाला शासकीय योजनांचा प्रत्यक्ष तत्काळ लाभ मिळणार आहे. भविष्यात शासन योजनेअंतर्गत विशेष प्रयत्न केले जाणार असून स्थानिक रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार आहे असे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांनी सांगितले. कातकरी उत्थान अंतर्गत सप्तसुत्री कार्यक्रमात पनवेल तालुक्यामधील 1 हजार 850 कातकरी जातीचे दाखले तयार करण्यात आले त्याचे वाटप करण्यात आले.
Comments