लोककलावंतांना मदतीचा हात म्हणून क्रियाशील प्रेसक्लबतर्फे लावणी कार्यक्रमाचे आयोजन..
लोककलावंतांना मदतीचा हात म्हणून क्रियाशील प्रेसक्लबतर्फे लावणी कार्यक्रमाचे आयोजन.. 
पनवेल / प्रतिनिधी : कोरोना आणि लॉकडाऊन यांचा फटका हा सर्व स्तरातील लोकांना तर बसला आहेच पण यात लावणी कलावंताचेही खूप हाल झाले. लॉकडाऊनचा मोठा फटका लावणी कलावंतांना बसला आहे. ऐन हंगामातच लोकडाऊन लागल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. अनेकांनी दिलेल्या सुपाऱ्या देखील रद्द करून ऍडव्हान्सदिलेला देखील परत घेतला. त्यानंतर तब्बल २ वर्षे लावणी कलावंतांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. कलावंतांच्या मुलांच्या शिक्षणाचे देखील अतोनात हाल झाले. कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदी आणि अंशतः टाळेबंदीमुळे जवळपास वर्षभर कलाकारांना कला सादर करता आली नसून ते आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये आहेत. गेले दीड वर्ष लावणी कलावंतासह इतर लोक कलावंतांना या लॉकडाऊनमुळे शो होत नव्हते, त्यामुळे आतापर्यंत अनेक कलावंतांनी आत्महत्या केल्या आहेत. काहींना या टेन्शनमुळे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अशातच अनेकदा मनोरंजन कार्यक्रम सुरु करण्यासाठी शासनाकडे मदत देखील मागितली गेली अनेकदा आंदोलने केली मात्र तरीही लोककलावंतांच्या पदरी निराशा आली. यासर्वांची दखल घेऊनच व लोककलावंतांना एक मदतीचा हात म्हणून पनवेलमधील क्रियाशील प्रेसक्लबतर्फे सौ. स्मिता हरी पाटणकर व समीर खाडिलकर प्रस्तुत *लावण्य दरबार* या लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदर कार्यक्रमात लावणीसम्राज्ञानी मेघा घाडगे, लावणीसम्राट आशिमिक कामठे, अंबिका पुजारी,कविता घडशी,यामिनी रागा, चांदनी देशमुख या लावण्यतारखा आपली कला सादर करणार आहेत. या लावणी कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ५ मार्च २०२२ रोजी रात्री ८.३० वाजता करण्यात आले असून यावेळी लावणी सादर करणाऱ्या महिलांचा प्रेसक्लबतर्फे मानाची साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या लावणी कार्यक्रमाची तिकिटे बुकिंग करण्यासाठी ७७७००९९३११,९८९२१०८७४७,९७०२१५३८५१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
Comments