शिवसेना नविन पनवेल शहरची सिडकोवर धडक
पनवेल / प्रतिनिधी : - नविन पनवेल शहरातील सेक्टर - ५ येथील उघड्या स्वरूपातील नाल्यावर झाकण टाकणे तसेच शहरातील सेक्टर २,३,४ व ५ या भागातील बंद स्वरूपातील स्ट्रीट लाईट चालू करणे संदर्भात आज मोहिले ( सिडको अधिक्षक अभियंता नविन पनवेल ) यांना नविन पनवेल शिवसेना शहराच्या वतीने निवेदन देण्यास आले.
यावेळी नविन पनवेल शहर प्रमुख श्री. यतिन देशमुख , शहर संघटिका सौ.अपूर्वा प्रभू , उपशहर संघटिका सुगंधा शिंदे , विभाग प्रमुख किरण सोनावणे , उपविभाग प्रमुख राजेश वैगणकर , अविनाश गव्हाणकर , शाखा प्रमुख शाम खडकबन , सिद्धेश गुरव , संदेश वाघमारे , तुषार चौधरी आदी उपस्थित होते.