मराठा बांधव राजेंना पाठींबा देण्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित राहण्याचा बैठकीत निर्णय..
मराठा बांधव राजेंना पाठींबा देण्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित राहण्याचा बैठकीत निर्णय
पनवेल दि.२० (वार्ताहर)- सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याची बैठक पेण येथे रविवारी 20 रोजी दुपारी 1 वाजता संपन्न झाली. मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात छत्रपती संभाजीराजे 26 तारखेपासून आझाद मैदानावर  आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषणात रायगड जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव राजेंना पाठींबा देण्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित राहणार आहेत. आज झालेल्या मिटिंग मध्ये सर्व समन्वयकानी सरकार वर रोष व्यक्त केला. गेल्या 2 वर्षांपासून राजे समाजाच्या प्रमुख 7/8 मागण्या संदर्भात आंदोलन करीत आहेत तरी पण राज्यसरकार फक्त आश्वासन देत आहेत पण प्रश्न सोडवत नाहीत म्हणून राजेंना आमरण उपोषण करावे लागत आहे हि बाब महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. आता तरी राज्य सरकारने आपल्या मागण्या मान्य करून अंमलबजावणी नाही केली तर या सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे सर्व समन्वयकानी भूमिका व्यक्त केली. आणि रायगड जिल्हा पूर्ण ताकदीने छत्रपती संभाजीराजे सोबत राहणार असा निर्धार करण्यात आला या मीटिंगला राज्य समन्वयक विनोद साबळे , मारुती पाटील , संतोष पवार , मंगेश दळवी , हरीश बेकावडे , प्रदीप देशमुख , नरेश सावंत , प्रवीण बैकर , अमित यादव या सह अनेक समन्वयक सहभागी झाले होते
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image