पनवेल शिवाजीनगर झोपडपट्टीतील १५ वर्षीय मुलगी बेपत्ता..
पनवेल शिवाजीनगर झोपडपट्टीतील १५ वर्षीय मुलगी बेपत्ता
मुलगी बेपत्ता..
पनवेल / प्रतिनिधी : पनवेल शहरातील शिवाजीनगर झोपडपट्टी या परिसरात राहणारी एक 15 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याने तिचा शोध पनवेल शहर पोलिस करीत आहेत. 

          विद्या विशाल साळुंखे असे या मुलीचे नाव असून रंग गव्हाळ, उंची पाच ते साडे पाच फूट, चेहरा उभट, डोळे काळे, नाक बसके, केस काळे मध्यम, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, निळ्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट घातला आहे. तसेच तिला मराठी, हिंदी, रजपूत भाषेचे ज्ञान आहे. सदर मुलगी ही शिवाजीनगर झोपडपट्टी पनवेल येथून मेडिकलमध्ये बँडेज आणण्यासाठी जाते असे सांगून गेली ती घरी परतलीच नाही तरी या मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दुरध्वनी-02227452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक दिपक शेळके यांच्याशी संपर्क साधावा.
Comments