वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पसार..
वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पसार

पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून मोटार सायकलवरुन आलेले दोघे इसम पसार झाल्याची घटना तक्का गाव परिसरात आज सकाळी घडली आहे.
पुष्पासन म्हात्रे (70 रा.तक्का ईडन गार्डन सोसायटी) या त्या परिसरातून पायी जात असताना मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात इसमापैकी एकाने त्यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन ज्याची किंमत जवळपास 65 हजार रुपये इतकी आहे खेचून पोबारा केला आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments