नगरसेवक नितीन पाटील यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा..
नगरसेवक नितीन पाटील यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा

पनवेल दि.19 (वार्ताहर)- पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक नितीन पाटील यांच्या उपस्थितीत आज पायोनिअर विभागातील अभिनव युवक मित्रमंडळाच्या माध्यमातून शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
            
आज सकाळी नगरसेवक नितीन पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करण्यात आले. अभिनव युवक मित्रमंडळाच्या माध्यमातून आज सालाबादाप्रमाणे यंदाही महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज व महापूजेचे पूजन केले.
         
फोटोः नगरसेवक नितीन पाटील पूजन करताना
Comments