अॅड.विनोद ठाणगे यांना करण्यात आली मारहाण
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः अॅड.विनोद ठाणगे हे त्यांच्या ऑफिसच्या जिन्यावरुन खाली उतरत असताना कोणीतरी अनोळखी इसमाने अज्ञात कारणास्तव त्यांच्या पाठीमागून येवून भेंडीच्या झाडाच्या भरीव दांडक्याने त्यांच्या मानेवर व उजव्या खांद्यावर मारुन त्यांना दुखापत केल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
शहरातील पनवेल म्युन्सिपल शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या मजल्यावर त्यांचे कार्यालय असून ते ऑफिसच्या जिन्यावरुन खाली उतरत असताना कोणीतरी अनोळखी इसमाने अज्ञात कारणास्तव त्यांच्या पाठीमागून येवून भेंडीच्या झाडाच्या भरीव दांडक्याने त्यांच्या मानेवर व उजव्या खांद्यावर मारुन त्यांना दुखापत केल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. सदर अनोळखी इसमाचे अंदाजे वय 25 ते 26 वर्षे, अंगाने मध्यम, डोक्याचे केस काळे असून अंगात निळ्या रंगाचा जिन्सचा शर्ट व फुल पॅन्ट व पायात काळ्या रंगाचे शुज, गळ्यामध्ये पांढर्या रंगाचा रुमाल घातलेला आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.