पनवेल शहर शिवसेना उपशहर प्रमुख पदी सुजन मुसलोंडकर,सनी टेमघरे, शैलेश जगनाडे, अबरार मास्टर यांची नियुक्ती..
पनवेल शहर शिवसेना उपशहर प्रमुख पदी सुजन मुसलोंडकर,सनी टेमघरे, शैलेश जगनाडे, अबरार मास्टर यांची नियुक्ती

पनवेल / (अनिल कुरघोडे)  : - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या सूचनेनुसार शिवसेना पनवेल शहर उपशहरप्रमुख पदी सुजन मुसलोंडकर, सनी टेमघरे, शैलेश जगनाडे ,अबरार मास्टर यांची नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सांगितले की या चारही उपशहरप्रमुख पदी नेमणूक करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमुळे निश्चितच पनवेल शहरात शिवसेना वाढीसाठी बळ मिळणार आहे, तसेच उपशहरप्रमुख पदी नियुक्त झालेल्या चोघांनीही सांगितले की पनवेल शहरात पक्ष वाढीसाठी व येणाऱ्या निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी स्वतःला झोकून देऊ. यावेळी चारही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी रायगड जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर, पनवेल तालुका संघटक भरत पाटील, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, शिवसेना महानगर प्रमुख रामदास शेवाळे, महानगर संघटक प्रथमेश सोमण, युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, प्रदीप ठाकूर, उपमहानगर संघटक अच्युत मनोरे, पनवेल शहरप्रमुख प्रविण जाधव, मा.नगरसेवक अनिल टेमघरे, अनिल कुरघोडे, चंद्रकांत शिर्के, अभिजित साखरे, कुणाल कुरघोडे, जुनेद पवार, जमील खान,राकेश टेमघरे, अमर पटवर्धन, संकेत बुटाला, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments