युवासेना पनवेल तर्फे शेडुंग टोलनाका व्यवस्थापकांना विविध मागण्यांसाठी निवेदन ..
युवासेना पनवेल तर्फे शेडुंग टोलनाका व्यवस्थापकांना विविध मागण्यांसाठी निवेदन 

पनवेल / प्रतिनिधी : - नियमानुसार सोयीसुविधा न पुरवता आणि केंद्राच्या आदेशाचे उल्लंघन करून होत असलेल्या चुकीच्या टोलवसुलीबाबत आज शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, युवासेना सचिव वरुण सरदेसाई ह्यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना उत्तर रायगड जिल्हा विस्तारक ओमकार चव्हाण तसेच जिल्हा अधिकारी मयुरजी जोशी यांच्या सुचनेप्रमाणे शिवसेना महाराष्ट्र राज्य सोशल मिडिया समन्वयक व पनवेल विधानसभा अधिकारी पराग मोहिते यांनी शेडुंग टोलनाका व्यवस्थापकांची युवासेना पनवेल विधानसभा टीमसह भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले..

या वेळी त्यांच्या व्यवस्थापकीय अधिकारात असलेल्या शेडुंग टोलनाक्यावर सातत्याने कर्मचार्यांची मुजोरी, असुविधांची मालिका आणि नियमांचे उल्लंघन करुन होत असलेल्या टोल वसुलीबाबत नागरीकांकडून सातत्त्याने नाराजी व्यक्त होत असल्याचे निदर्शनास आणले.. ह्याच मुद्द्याला अनुसरून युवसेनेतर्फे त्यांना खालील मुद्द्यांच्याबाबत जाब विचारत काही विषय आणि मागण्या मांडल्या... 

१) एका टोलनाक्याची हद्द हि दुसऱ्या टोलनाक्यापासून ३५ किलोमीटर अंतरावर असते. अशातच १० किलोमीटर अंतरापर्यंतच्या नागरिकांना टोलमधे माफी देण्याचाही नियम टोल नियमावलीत आहे. त्याला अनुसरूनच सदर टोलनाक्यावरही १० किलोमीटरच्या नियमानुसार दोन्ही बाजूला समान किलोमीटर पर्यंत ही टोलमाफी देण्यात यावी व त्यात महानगरपालिका हद्दीतील पनवेल, नविन पनवेल आणि खांदाकॉलनी शहराचाही समावेश व्यवस्थापनाकडून करण्यात यावा...

२) मे, २०२१ मधे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने जाहीर केल्यानुसार सर्वच टोलनाक्यांवर वाहन चालकांच्या माहितीसाठी १०० मिटर अंतरावर पिवळी पट्टी मारलेली असणे बंधनकारक आहे. ज्याच्या पुढे वाहनांची रांग गेल्यास सदर वाहनांना टोलपासून मुक्ती देण्यात आलेली आहे. सदर टोलनाक्यावर दोन्ही बाजूला अशी कोणतीही पट्टी नसून वाहनांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या असतानाही सक्तीने टोलवसुली केली जात आहे. हे तातडीने थांबवून सरकारी आदेशानूसार टोलवसुली करण्यात यावी अशी मागणी केली...

३) FastTag साठी स्वतंत्र रांग करण्यात यावी आणि त्याला व्यवस्थितरीत्या वाहकांच्या माहितीसाठी १०० मिटर आधीच बॅरिकेटींग करण्यात यावे जेणेकरून FastTag वाहने न थांबता तातडीने निघून जातील अशी सोय करण्याचीही मागणी केली..

४) नियमानुसार टोलनाक्याच्या दोनही बाजूला शौचालयाची सुविधा असणे बंधनकारक आहे. आपल्याकडे चौककडे जाणाऱ्या मार्गिकेवर शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही ती तातडीने करण्यात यावी अशी मागणी केली..

५) सदर टोलनाक्यावर असलेले कर्मचारी हे गणवेशात नसतात. त्यामुळे एखादा वादविवाद झाल्यास कोणीही व्यक्ती वाहनचालकांशी हुज्जत घालत असल्याची तक्रारही वाहनचालक सातत्याने नोंदवत आहेत. तेंव्हा टोलनाक्यावरील प्रत्येक कर्मचाऱ्यांना गणवेश बंधनकारकच असावा अशीही मागणी केली..

युवासेनेच्या माध्यमातून केलेल्या वरील सूचना आणि तक्रारींची तातडीने दखल घेतली जावी व लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी असे व्यवस्थापनाशी केलेल्या चर्चेत ठरले.. 

यावेळी उपजिल्हाधिकारी अवचित राऊत, उपविधानसभा अधिकारी सनी टेमघरे, उपविधानसभा अधिकारी निखिल दिघे, शहर अधिकारी जितेंदर सिद्धू, शहर अधिकारी सागर पाटील, उपशहर अधिकारी विराज साळवी, विभाग अधिकारी जिवन पाटिल, विभाग चिटणीस प्रणव लबडे आदी उपस्थित होते..
Comments
Popular posts
शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी "आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावून महापालिका लढ्याच्या मोहिमेची केली सुरुवात...
Image
एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले सांत्वन ....
Image
शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न...
Image
वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन पनवेल तालुका पोलीस ठाण्याने उभारले सूचना फलक...
Image
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते व जुने विजेचे खांब त्वरित बदलण्याची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या युवासेने तर्फे पनवेल महानगरपालिकेकडे मागणी..
Image